आपले सर्वांचे माझ्या या शैक्षणिक blog मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे .

Sunday, 8 July 2018

शिक्षकांची कर्तव्ये


               शिक्षकांची कर्तव्ये
1.   नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे .
2.   
निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण बालकांची प्रगती सुनिश्चित करणे .
3.
गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची   प्रगती साध्य करणे .
4.
व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे .
5.
पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती,क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे
6.
विविध प्रशिक्षणात सहभागी होणे .
7.
परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे .
8.
शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.
9.  
शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे.
10.  
सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे .
11.  
गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे.
12.
शालेय दैनंदिन उपक्रम, सहशालेय उपक्रम यात सक्रीय सहभाग नोंदवणे .
13.
कृतीशील अध्ययन,ज्ञान रचनावाद,बालस्नेही,बालाकेंद्रित वातावरण, स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे.
14.
शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत,निर्मल ग्राम योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान इ.योजनांची माहिती ठेऊन गरजेनुसार सक्रीय सहभाग
नोंदविणे .
15.
सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे.
16.
बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे .
17.
शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन अध्यापनात नियमित वापर करणे . ऊदा . संगणक, टी. व्ही . ,गणित पेटी , विज्ञान पेटी , नकाशे , स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड , विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी .
18.
वर्गाशी /शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे .
19.
मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे .
20. RTE ACT 2009
RTE RULES 2011यातील सर्व तरतुदींचे पालन करणे.